‘सरकार आंधळं आणि बहिरं’; भाजप खासदार नाना पटोले बरसले

बेताल मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी लगाम घालावा-पटोले

कोल्हापूर : महाराष्ट्रात सर्वाधीक शेतकरी आत्महत्या होत असून सरकारच कर्जमाफीचे काम बरोबर नाही, तसेच राज्यातील मंत्र्यामध्ये विसंवाद आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की चंद्रकांत पाटील हेच कळत नसल्याचं म्हणत सरकार आंधळं आणि बहिर असल्याने चुकीच्या भूमिकेविरोधात आपण आवाज उठवत असल्याचा घणाघात भाजप खासदार नाना पटोले यांनी केला आहे. कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या काही महिन्यांपासून नाना पटोले हे स्वपक्ष भाजप विरोधात आवाज उठवत असल्याने चर्चेत आले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपला घराचा आहेर दिला आहे. सरकारमधील बेताल मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी लगाम घालावा. असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला आहे.

You might also like
Comments
Loading...