दुष्काळ जाहीर पण उपाययोजना कुठेआहेत?; अजित पवारांचा सवाल

ajit pawar

पुणे : राज्यातील सरकार दुष्काळ जाहीर करते, पण उपाययोजना कुठे आहेत. चारा छावण्या नाहीत, पाण्याचे टँकर नाहीत, शेतकऱ्यांच्या पीकांना पाणी उपलब्ध नाही, नियोजनाअभावी राज्य मागं चाललं आहे आणि हे सरकार त्याला कारणीभूत आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ते चोपडा येथील राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, चोपडा आणि आसपासच्या भागातील आदिवासी महिलांनी आपल्या मागण्यांसाठी मुंबईत येऊन आंदोलन केले, मंत्रालयात धडक दिली, शेकडो कोस पायपीट करून या माऊलींचे पाय रक्तबंबाळ झाले, तरी इथल्या आदिवासींना न्याय मिळाला नाही, किती संवेदनाशून्य हे सरकार आहे.

राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा चालू आहे. या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून सर्वांशी सवांद साधला जाणार आहे. यावेळी अजित पवार म्हणाले, ‘राज्यातील सरकार दुष्काळ जाहीर करते, पण उपाययोजना कुठे आहेत. चारा छावण्या नाहीत, पाण्याचे टँकर नाहीत, शेतकऱ्यांच्या पीकांना पाणी उपलब्ध नाही, नियोजनाअभावी राज्य मागं चाललं आहे आणि हे सरकार त्याला कारणीभूत आहे’.