तुळजापूर चैञी याञे बाबत शासन व मंदिर समितीने तातडीने निर्णय घ्यावा

तुळजापूर : चैञी याञे बाबतीत काय निर्णय होणार याची उत्सुकता भाविक व्यापारी, पुजारी, वृद्धांना लागली आहे . ऐन वेळी याञा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास याचा ञास व्यापारी व देविभक्तांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळै चैञीपोर्णिमा याञेवर कोरोनाची सावट आल्याचे पहावयास मिळत आहे. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी चैञी पोर्णिमा दिनी भरणारी याञा ८ ऐप्रिल रोजी संपन्न होणार आहे.

परंतु सध्या महाराष्ट्रात कोरोना वायरस चे लागण झालेले संशियत रुग्ण सापडू लागले आहेत. चैञीपोर्णिमे याञेस ग्रामीण भागातुन खासकरुन मराठवाड्यातील भाविक लाखोचा संख्यने येतात. याञा पार्श्वभूमीवर शासन वतीने जादा बसेस, जादा पोलिस बंदोबस्त याची व्यवस्था केली जाते, या याञेत व्यापारी विविध वस्तू प्रासदिक साहित्य विक्री मोठ्या प्रमाणात करतात साधारणता व्यापारी या याञेची पुर्वतयारी एक महिने आधी पासुन माल खरेदी करुन करतात.

जर शासनाने ऐनवेळी याञे बाबतीत वेगळाच निर्णय घेतला तर व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात अर्थिक नुकसान होणार आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव याञा काळात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत असतो.आरोग्याच्या दृष्टीने भाविकांची काळजी प्रशासन कडून घेतली जाते. या पार्श्वभूमीवर याञा काळात भाविक, नागरिक, पोलिस कर्मचारी व याञे तैनात विविध खात्याचे कर्मचारी असे मिळुन तीन ते चार लाख लोकांना कोरोनाची लागण होवु नये यासाठी शासन काय उपाययोजना करणार याची माहीती आताच जाहीर करणे गरजेचे आहे.

सध्या शासनाने गर्दी एकञित करणाऱ्या अनेक याञा उत्सव कार्यक्रम रद्द करण्याचा सपाटा लावला आहे या याञे बाबतीतही शाषणाने स्थानिक पुजारी व्यापारी व भक्त यांचा सोबत चर्चा करुन निर्णय घेण्याची मागणी होत आहे विशेष म्हणजे या याञेत कर्नाटक, आंध्र, तेलगंणा येथील भाविक मोठ्या संख्येने येतात त्या राज्य प्रमुखांना ही याञे बाबतीत अवगत करण्याची मागणी होत आहे.