वडार समाजाच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक- मुख्यमंत्री

लातूर  : प्राचीन काळापासून काबाडकष्ट, कठोर मेहनत करणारा, सच्चा आणि प्रामाणिक अशा वडार समाजाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक आह, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

येथील मारवाडी राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित वडार समाजाच्या राज्यस्तरीय महामेळाव्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण व जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे, खासदार डॉ. सुनील गायकवाड, वडार समाजाचे धर्मगुरू जगतगुरु श्री ईमाडी श्रीसिद्धरामेश्वरा स्वामी यांची मेळाव्यास उपस्थिती होती.

Loading...

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, समाजाच्या उत्थानासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य केल्यास निश्चितच समाजाचा विकास होण्यास मदत होईल. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेत केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाबरोबरच राज्याच्या कामगार कल्याण विभागाकडून वडार समाजाच्या नवीन घरकुलासाठी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल. त्याचबरोबर वडार समाजाचे बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मजूर सोसायट्यांना काम देताना वडार समाजाच्या सोसायट्यांना प्राधान्य देण्यात येईल. वडार समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नांचा अभ्यास करुन त्याबाबत सकारात्मकपणे विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

वडार समाजाच्या विकासासाठी कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून समाजाच्या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल. त्या समितीत समाजातील नेत्यांचाही अंतर्भाव करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च, प्रशिक्षण कार्यक्रम, वृद्धांना पेन्शन, आरोग्यविषयक सुविधा अंतर्भूत असलेली वडार समाजासाठी विशेष योजनेची निर्मिती करण्यात येईल. भटके विमुक्त आणि इतर मागास प्रवर्गाच्या विकासासाठी स्वतंत्र अशा ओबीसी मंत्रालयाची निर्मितीदेखील करण्यात आली आहे. त्या मंत्रालयाला तीन हजार कोटींची तरतूद करून देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गुरु ईमाडी श्रीसिद्धरामेश्वरा स्वामी यांनी कानडी, तेलगू भाषेतून संवाद साधला. भाषेपेक्षा याठिकाणी भाव महत्त्वाचा आहे. त्यांच्या भाषेतील भाव मला समजला आहे. वडार समाजाला प्राचीन इतिहास आहे. छत्रपती शिवरायांच्या रायगड बांधणीत हिरोजी इटळकरांची मोलाची अशी भूमिका होती. त्यांचे स्वराज्यवरील प्रेम अफाट होते. सच्चेपणाने त्यांनी छत्रपती शिवरायांची चाकरी केली. त्यामुळे स्वराज्यातील सर्व किल्ल्यांच्या निर्मितीत वडार समाजाचे योगदान अतुलनीय असेच आहे. ब्रिटिशांना नामोहरम करणारा देखील वडार समाज आहे. देशप्रेमी असणाऱ्या वडार समाजाच्या इच्छा, आकांक्षाच्या पूर्तीसाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

श्री.पाटील-निलंगेकर म्हणाले, वडार समाज प्रामाणिक आणि सच्चा समाज आहे. बांधकाम कामगारामधील हा महत्वाचा घटक आहे. त्याची नोंदणी व्हायला पाहिजे. नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाच्या शुल्काची व्यवस्था शासनामार्फत करण्याचा विचार आहे. या समाजाच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर आहे. या समाजाने उच्च शिक्षण घेऊन पुढे यावे, सनदी सेवेत यावे व समाजाचा विकास साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

वडार समाजाचे धर्मगुरु ईमाडी श्रीसिद्धरामेश्वरा स्वामी यांनी तसेच श्री. निंबावळे यांनीही विचार मांडले. सुरूवातीला समाज महामेळावा समितीच्यावतीने श्री. फडणवीस यांचा पारंपरिक पद्धतीने जातं, उखळ आणि मजूर शिल्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने