देशात राज्याचा कारभार नंबर वन आहे! उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री – संजय राऊत

sanjay raut

मुंबई- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९५ वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली जात आहे.राज्याच्या जडणघडणीचा इतिहास अभ्यासायचा असेल तर शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाकडे कानाडोळा करुन चालणार नाही. मुंबईसारख्या शहरात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरुन एक संघटना म्हणून नावारुपाला आलेल्या शिवसेनेने नंतर संपूर्ण राज्यामध्ये कसं प्रस्थ निर्माण केलं हे बहुतांश जणांना ज्ञात आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे कडवे शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त एक खास ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘साहेब…तुमच्या सारखे तुम्हीच!’ असे म्हणत राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी दादर येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर शिवसैनिक व नेत्यांची रीघ लागली आहे. यावेळी संजय राऊत यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.

‘आज बाळासाहेबांचा आमच्यासाठी जन्मदिवस असून आजही बाळासाहेब आमच्या सोबत आहेत. आज जे काही महाराष्ट्राचे, शिवसेनेचं, महाविकास आघाडीचं चाललं आहे त्यामागे बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे आणि तो कायम असणार आहे’, अशा भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत.

‘बाळासाहेबांनी जे काही पुण्य केलं त्या पुण्याईवर महाराष्ट्र आणि मराठी माणूस टिकून आहे. याबाबत आम्हाला आनंद आहे,’ असं नमूद करत ‘आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत. देशात राज्याचा कारभार नंबर वन आहे. उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. नक्कीच बाळासाहेब जिथं कुठं असतील तिथून ते आनंदात दोन्ही हातांनी आम्हाला आशीर्वाद देत असतील,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या