आता ‘महानगरपालिका’त सत्तांतरासाठी गोटे-खडसे प्रयत्न करणार

धुळे: भाजप बंडखोर एकनाथ खडसे यांनी सीमोल्लंघन करत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतल्यावर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे बळ निश्चितच वाढणार आहे.अनेक समीकरणं आता बदलतील असा अंदाज असतांना एक चर्चा सुरु झाली आहे,की आता एकनाथ खडसे आणि अनिल गोटे मिळून महानगरपालिका आणि नगरपालिका सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

सध्या धुळे जिल्ह्यात धुळे महानगरपालिका, दोंडाईचा नगरपालिका आणि शिरपूर नगरपालिका येथे भाजपची एकहाती सत्ता आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतर करण्यासाठी एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे हे एकत्र येऊन काम करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

सध्या माझ्या संपर्कात भाजपचे एकूण १६ नगरसेवक आहेत आणि अनेक जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत, परंतु पक्षश्रेष्ठींचा आदेश येईपर्यंत सध्या तरी काहीच हालचाली आम्ही करणार नाही. पण समजा वरून आदेश आला की लगेच कारवाई केई जाईल असे अनिल गोटे म्हणाले आहेत.

धुळे महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र, यातील बहुतांश नगरसेवक हे राष्ट्रवादीतून भाजपात गेले आहेत. येणाऱ्या काळात हेच नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत आल्यास धुळे महानगरपालिकेत सत्तांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.परिणामी येत्या काळात काय होतं हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या