‘आ.गोरेंना जनाधार राहिला नसल्याने त्यांची भाजपात येण्यासाठी धडपड’

टीम महाराष्ट्र देशा : आमदार जयकुमार गोरे यांना जनाधार राहिला नसल्यामूळे ते आता कधीच निवडून येणार नाहीत. म्हणून ते भाजपाच्या प्रवेशासाठी धडपडत असून जनाधार नसलेल्या आमदार गोरेंना भाजपाने पक्षात घेऊ नये असे स्पष्ट मत भाजपाचे माण-खटाव विधानसभा अध्यक्ष डॉ. महादेव कापसे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान आमदार गोरे यांना भाजपात प्रवेश देऊ नये, असा ठराव यावेळी प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत एकमताने संमत करण्यात आला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या नियोजनार्थ भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक दहिवडी येथील पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी आमदार जयकुमार गोरे यांना भाजपात प्रवेश देऊ नये, असा ठराव करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार साखरे, ज़िल्हा नियोजन सदस्य बाळासाहेब खाडे, पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा. विश्‍वंभर बाबर, उपस्थित होते.

Loading...

दरम्यान, ज्या उमेदवारावर विनयभंग, बलात्कार, फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्या उमदेवारास पक्षाने तिकिट देऊ नये. सामान्य माणसाला तिकीट दिले तरी आम्ही स्वखर्चाने त्या उमेदवारास निवडून आणणार आहे. ज्याला पक्ष तिकीट देईल त्यांचे मनापासून काम करून निवडून आणू. मात्र चूकीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आम्ही साथ देणार नाही. कुठेही भाजपाच्या कार्यकर्त्याला डावलणार नाही. भाजपने माणच्या 32 गावांना पाणी मागणी केली आहे. भाजपाच पाणी देणार आहे. केवळ आयत्या कामाचे श्रेय घेण्याचे काम गोरे करत आहेत. काँग्रेसच्या सत्तेच्या काळात त्यांनी उत्तर भागावर अन्याय केला आहे. त्यामुळे आज झालेल्या भाजपा पदाधिकारी बैठकीत आमदार गोरे यांच्या प्रवेशाला विरोध करण्यात आला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी