तथाकथित गोरक्षकांचा हिंसाचार रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली : स्वयंघोषित गोरक्षकांकडून होणारा हिंसाचार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधिकारी नेमण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना आज दिले.

गोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हिंसाचाराविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने कायदा हातात घेणाऱ्या गोरक्षकांविरोधात कडक कारवाई करा असे आदेश दिले. तसेच प्रत्येक जिल्ह्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करा आणि याबाबतचा अहवाल सादर करा, असेही न्यायालयाने नमूद केले.