योगी आदित्यनाथ यांना हरवण्यासाठी कट्टर दुश्मन झाले एकत्र !

टीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशमधील गोरखपुर आणि फूलपुर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजप विरोधात लढण्यासाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी एकत्र आले आहेत. बसपा प्रमुख मायावती यांच्या निवासस्थानी शनिवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली होती.

त्यानंतर या पोटनिवडणुकीत सपाला पाठिंबा देण्याची घोषणा रविवारी करण्यात आली. भाजप विशेषत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानल्या जाणाऱ्या गोरखपूरमध्ये पराभव करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत.

राजकारणात कोणीच कायम स्वरुपी कोणाचा मित्र वा शत्रु नसतो. जेव्हा एखादा राजकीय पक्ष फारच मोठा होतो तेव्हा त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी दोन कट्टर विरोधक सुद्धा एकत्र येतात. उत्तर प्रदेशच्या राजकारणात सध्या असेच काहीचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या गोरखपूर आणि फूलपुरमध्ये ११ मार्च रोजी मतदान होणार आहे.

सत्ताधारी भाजपने विधानसभेच्या ४०३ पैकी ३०० वर विजय मिळवला होता. लोकसभेच्या या पोटनिवडणुकीत देखील भाजपचा विजय होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तरी गेल्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकल्यास सपाला २८ टक्के तर बसपाला 22 टक्के मते मिळाली होती. हे दोन पक्ष एकत्र आले तर भाजपसाठी ही निवडणूक कठीण ठरू शकते.Loading…
Loading...