गोरखपूर: मतमोजणीचे आकडे न सांगितल्याने जिल्हाधिकाऱ्याला नोटीस!

rajeev rutela

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा पोटनिवडणुकीचे आकडे न सांगितल्यामुळे जिल्हाधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी राजीव रौतेला यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गोरखपूरमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फेरीची मतमोजणीची आकडेवारी जाहीर झाली तेव्हा सपा उमेदवार भाजपच्या उमेदवाराला मागे टाकत आघाडी घेतली होती. त्यानंतर दहाव्या फेरीपर्यंत मतमोजणीचे आकडे जाहीर करणं थांबवण्यात आलं होतं.

जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या प्रतापाला निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतलं आहे. तब्बल साडेतीन तास आकडे जाहीर न केल्यानं याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलंय. दरम्यान, विरोधकांनी या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ घातला. सर्व देशाचे लक्ष असणाऱ्या उत्तर प्रदेश पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. विजयाची घोडदौड सुरु ठेवणाऱ्या भाजपसाठी हि निवडणूक प्रतिष्ठेची आहे. एकाही जागेवर पराभव झाल्यास भाजपासाठी हा मोठा धक्का समजल्या जाणार असून योगींचा बालेकिल्ला ढासळणार असल्याचे चित्र दिसत आहेत.Loading…
Loading...