औरंगाबाद:भाजपच्या उमेदवारांना मतदान करा त्यांना निवडून आणा अन्यथा तुम्हाला गावात राहू देणार नाही अशा प्रकारची धमकी भाजप आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर येथील गावकऱ्यांना दिली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे(Rupali Patil Thombare) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. गोपीनाथराव मुंडे(Gopinathrao Munde) यांनी लोकांसाठी संघर्ष केला आणि आज तीच भाजप लोकांसोबत संघर्ष करत असल्याचे ट्विट करत त्यांनी भाजपवर टिका केली आहे.
१८ जानेवारी रोजी बदनापूर नगर पंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यासाठी प्रचारासाठी निघालेल्या भाजप आमदार नारायण कुचे यांनी प्रचाराच्या सगळ्या सीमा ओलांडल्या. भाजप उमेदवारांना मतदान करा त्यांना निवडून आणा अन्यथा तुम्हाला या गावात राहू देणार नाही. अशा प्रकारची धमकीच त्यांनी प्रचारादरम्यान गावकऱ्यांना दिली. अशा वेळी संतप्त झालेल्या काही गावकऱ्यांनी त्यांच्या अंगावर दगड भिरकावल्यानंतर त्यांच्या अंगरक्षकांनी साहेब म्हणतात तसेच करा अन्यथा तुमची सोय पाहून घेऊ असा इशारा यावेळी दिला. याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची लोकांसाठी संघर्ष करणारी भाजपा ; आज लोकासोबतच संघर्ष करत आहे ..#नवीभाजपा #हरलेलीमानसिकता #भाजपाहटाव pic.twitter.com/OYAD9JgH4Q
— Rupalipatilthombare (@Rupalispeak) January 9, 2022
भाजप उमेदवाराला मतदान करा अन्यथा तुम्हाला या गावात राहू देणार नाही असे कुचे यांनी धमकावले. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी नारायण कुचे यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची लोकांसाठी संघर्ष करणारी भाजप आज लोकांसोबत संघर्ष करीत आहे. त्याचप्रमाणे हरलेली मानसिकता आणि भाजप हटाव अशा प्रकारचे हॅशटॅग त्यांनी या ट्विटमध्ये वापरले आहेत. त्याचप्रमाणे नारायण कुचे यांच्या विरोधात आलेली बातमी शेअर करत पाटील यांनी हे ट्विट शेअर केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गुगलकडून देशातील पहिल्या मुस्लिम शिक्षिकेला अभिवादन; जाणून घ्या कोण होत्या फातिमा शेख
- “किरीट सोमय्या हळूच कुठलीतरी गोळी खातात, ती फस्ट्रेशनची आहे का?”, किशोरी पेडणेकरांचा सवाल
- सावधान! आता डेल्टा आणि ओमायक्रॉनचे मिश्रण असलेला ‘डेल्टाक्रॉन’ आलाय
- गोव्यात काँग्रेसच्या सक्षम नेतृत्वाअभावी १७ चे २ आमदार झाले-संजय राऊत
- “तुम्ही ज्या रुग्णालयाचे उद्घाटन करताय ते आम्ही यापूर्वीच केलेले”, ममतांचे मोदींसमोरच विधान
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<