VIDEO- भाजपच्या महामेळाव्यात गोंधळ ; मुंडे समर्थकांची घोषणाबाजी

टीम महाराष्ट्र देशा : भाजपच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईमध्ये आज भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र या मेळाव्यात गोपीनाथ मुंडे समर्थकांनी गोंधळा घातला आहे.

”राज्यात भाजप पक्ष आहे, तो गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आहे, मात्र इथे आल्यानंतर त्यांचा फोटोच बॅनरवर नसल्याचं दिसलं. भाजपने बॅनरवर त्यांचा फोटो लावावा,” अशी मागणी मुंडे समर्थकांनी केली. मुंडे समर्थक आक्रमक झाल्याचे दिसत असताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी मंचावरून कार्यकर्त्यांना शांततेच आवाहन करत गोंधळ शांत केला.