मुंबई : सगळ्यांचे लक्ष आजच्या दसरा मेळाव्यावर लागले आहे. यंदा शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे.राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच या दसरा मेळाव्यावरून विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप, टोलेबाजी करण्याची चढाओढ लागली असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच भाजप (BJP) पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे(Pankja Munde) यांनी दसरा मेळाव्याव्यात एक वक्तव्य केलं आहे.
पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचे म्हटलं आहे. “माझ्या नाराजीची चर्चा बंद करा. कोणीही नाराज नाही. कुणाचीही अवहेलना करू नका, कोणाचा अपमान करू नका, ही माझी इच्छा आहे” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्याबरोबरच गोपीनाथ मुंडे यांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष आल्याचं त्यांनी सांगितलं. त्या काळात प्रवाहाविरोधात ज्या पक्षात कोणीच जात नव्हतं त्या पक्षात गोपीनाथ मुंडे कमळाचे फुल हातात घेऊन आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढले. त्यांचा संघर्ष कमी झाला का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
४० वर्षाच्या राजकारणात केवळ साडेचार वर्षे सत्ता मिळाली हा संघर्ष कमी आहे का? गोपीनाथ मुंडे यांचा हा संघर्ष आपल्यासमोर असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. माझ्या अंगात हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघणाऱ्या शिवरायांचे संस्कार, भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचे रक्त आहे. मी थकणार नाही आणि कधीही कुणासमोर झुकणार नाही असं त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. मला स्वाभिमान आहे. माझ्या लेखी नाराजीचा विषय संपला आहे. ज्यांना मंत्री करायचं ते करतील आपण 2024 च्या तयारीला लागायचं असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.
दरवर्षी राज्यात दोन दसरा मेळावा असायचे. त्यातील एक मी दुपारी घ्यायचे, तर दुसरा मुंबईमध्ये व्हायचा. यावर्षी आणखी एक मेळावा होत आहे, एकनाथ शिंदे यांचा असं म्हणत मी सर्वांना शुभेच्छा देते, तसेच या सर्व मेळाव्यातून जनतेचे, वंचितांचे, पीडितांचे, विषय प्राधान्याने घेतले जातील, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Pankaja Munde | दसरा मेळाव्याचं कुणाचं भाषण ऐकणार? पंकजा मुंडे म्हणाल्या…
- Shivsena | “शहांच्या ताटाखालच्या मांजराचा हा दसरा मेळावा”; सेनेचा एकनाथ शिंदें यांच्यावर हल्लाबोल
- Shivsena | “एक दिवस भाजप या गद्दारांना…”; सेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल
- Ajit Pawar | दसरा मेळाव्यावरून अजित पवारांचं उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना आवाहन, म्हणाले…
- RSS | विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालकांकडून मातृशक्तीचा गौरव