प्रकाश शेंडगेंनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला

टीम महाराष्ट्र देशा : प्रकाश शेंडगे हे गोपीनाथ मुंडे यांना किती टोकाचे बोलले, हे भाजपच्या लोकांना माहीत नाही. शेंडगेनीच गोपीनाथ मुंडेना सर्वाधिक त्रास दिला आहे. तेच शेंडगे आता भाजपच्या नेत्यांना भेटत आहेत, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेंडगे यांच्यावर निशाणा साधला आहे. एका वृत्त वाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. यावेळी फडणवीसांनी शेंडगे यांच्याबद्दलची नाराजी बोलून दाखवली.

ओबीसी नेत्यांची खदखद ही मीडियाने तयार केलेल्या बातम्या आहेत. पहिल्यांदा पंकजा मुंडेंच्या नावाने त्या बातम्या चालवल्या. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. मी त्यांची भेट घेऊन तासभर चर्चा केली. काही मुद्दे असतीलही. पण सर्वकाही ठिक आहे. नंतर एकनाथ खडसे नाराज असल्याचा चर्चा सुरु झाल्या. पण ओबीसी नेते म्हणून त्यांना भेटायला कोण ? तर प्रकाश शेंडगे. ते कोणत्या पक्ष्यात आहेत? काँग्रेसमध्ये की राष्ट्रवादीत मला, माहीत नाही. हेच शेंडगे गोपीनाथ मुंडे इतके टोकाचं बोलले हे भाजपच्या लोकांना माहीत नाही.

Loading...

त्यानंतर ते म्हणाले, जात म्हणून आमदारांकडे पाहणे चुकीचे आहे, पण मी सांगतो भाजपचे १०५ आमदार आहेत. यातील ३५ मराठा, ३७ ओबीसी समाजाचे, १८ अनुसूचित जाती जमातीचे आणि सात खुल्या वर्गातील आहेत. पहिल्यापासून भाजपने ओबीसी समाजाला सर्वाधिक प्रतिनिधित्व देण्याचे काम केले आहे. ओबीसी समाजाला खरोखर आपला पक्ष कोणता वाटत असेल तर भाजपच वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा ओबीसी आहेत. पण ते कधी सांगत नाहीत. त्यांना जातीवर बोललेले आवडत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
मंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
मशिदींना हात लावल्यास रिपब्लिकन पक्ष मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील - रामदास आठवले