fbpx

आई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएममध्ये छेडछाड झाली असल्याचं माहित होतं. म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली, असा दावा सईद शूजा या अमेरिकन हॅकरने केलाय. विरोधकांनी आता गोपीनाथ मुंडेंच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, कथित अमेरिकन हॅकरने केलेल्या दाव्यानंतर भारतात खळबळ माजली आहे.

दरम्यान, या सगळ्यानंतर मुंडे कुटुंबियांकडून अजून देखील काही अधिकृत प्रतिक्रिया आली नसून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या मंत्रिमंडळ बैठकीला देखील गैरहजर राहिल्या आहेत. तब्बेत ठीक नसल्याने मुंडे बैठकीला गैरहजर असल्याचं सांगण्यात येत आहे. तर गोपीनाथ मुंडे यांच्या मोठ्या भगिनी सरस्वती कराड यांनी देखील लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केली आहे.

दिल्लीत आपलं कोण होत त्याच्याबरोबर, माझा एकटा वाघ होता फक्त दिल्लीत आता आपल्याला कसं कळेल त्याला कोणी मारलं की तोच मेला अशी खंत सरस्वती मुंडे यांनी व्यक्त केली आहे. आई कायम सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको दिल्ली चांगली नाही तुझा घात होईल आणि तसचं झालं. तू राजकारण सोडून दे असं देखील आई म्हणायची पण साहेब नेहमी सांगायचे मला समाजाच कल्याण करायचं मी एवढा संघर्ष केलाय अन आता राजकारण सोडून दिल तर कस होईल. अशी आठवण देखील सरस्वती कराड यांनी यावेळी सांगितली आहे.