शेवगाव मध्ये सर्व पक्षीय नगरसेवकां कडून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी

शेवगाव/रवी उगलमुगले: शेवगाव शहरात आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगरसेवकांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली.

bagdure

दरम्यान, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या अपघातामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी होत असलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावर यामुळे शोककळा पसरली. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर होणारे सर्व कार्यक्रम रद्द करून साध्या पद्धतीने गाठीभेटी घेण्याचे ठरवले. त्यामुळे महाराष्ट्रभर साजरी होत असलेली लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करताना कार्यकर्ते आपणास दिसत आहेत.
यावेळी गोपीनाथराव मुंडे चौकात सर्वपक्षीय नगरसेवकांनी पुष्पहार अर्पण केले.

या कार्यक्रमाला अरूण मुंढे, हर्षदाताई काकडे, विनोद मोहिते, बंडु मेहर, संजय नांगरे, अजिनाथ विघ्ने, नगरसेवक आंकुश कुसळ्कर,दिंगबर काथवटे, महेश फलके, शब्बीर शेख, साईनाथ आधाट, अभय फलके, निखिल घटे कार्यकर्ते उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...