Gopichand Padalkar | अजित पवारांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरली; म्हणाले…

Gopichand Padalkar | पुणे : काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातील भाषणात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी धर्मवीरच्या मुद्द्यावर सभागृहात भाष्य केलं होतं. आज संभाजी महाराज यांच्या विषयी काही लोक चुकीचं बोलतात. त्यांना धर्मवीर बोलतात, पण संभाजी राजे हे स्वराज्यरक्षकच होते, असं अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात म्हटलं होतं.

त्यांच्या या विधानावर भाजपने आक्रमक पावित्रा घेतला होता. अशातच आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी यावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक या वादावर बोलताना पडळकर म्हणाले की, “संभाजी महाराजांना जे धर्मवीर मानत नाही, त्यांची कदाचित सुंता झाली असती, माध्यमांनी जाऊन पहा.” गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या या विधानाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

गोपीचंद पडळकरांनी नेमकी काय टीका केली?

‘आज छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी काही लोकं चुकीचं बोलतायेत. धर्मवीर संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असं बोलतायेत. आपल्या सगळ्यांना इतिहास माहित आहे. धर्मवीर संभाजी महाराजांसोबत कशा चुकीच्या पद्धतीने व्यवहार केला. त्यांना धर्म बदलण्यासाठी किती त्रास दिला. परंतु छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म बदलला नाही.’ ‘संभाजी महाराज हे धर्मवीर नसते.. जे कोणी म्हणतायेत संभाजी महाराज धर्मवीर नव्हते त्यांची कदाचित सुंता झाली असती. जर त्यांना तसं वाटत असेल तर मीडियाला माझी विनंती आहे की, त्यांना जाऊन चेक करा. काय परिस्थिती आहे त्यांची. ही परिस्थिती झाली असती की नसती ते सांगा.’ असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी टीका केली.

Ajit Pawar controversial statement

‘मी पुन्हा एकदा सांगतो, छत्रपती संभाजी महाराज यांना आपण जाणीवपूर्वक स्वराज्यरक्षक म्हणतो. ते स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापन केली. पण, काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात, मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा.’ असं अजित पवार म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :

Back to top button