जयंत पाटील हा अत्यंत तज्ञ, बुद्धिवान आणि पंडित माणूस, पडळकरांचा जोरदार टोला

jayant patil - padalkar

सांगली : राज्यात कोरोनाचा कहर वाढत असून हि चिंतेची बाब आहे. त्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पुणे, औरंगाबाद, कोल्हापुर, सोलापूर पाठोपाठ आता सांगली जिल्ह्यात देखील लॉकडाऊन करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली.

दरम्यान, करोनाचा फैलाव वाढत असल्याने सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत जिल्ह्यात २२ ते ३० जुलै दरम्यान लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. ग्रामपंचायत वगळता पूर्ण सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे ३० जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार राहणार बंद राहणार आहेत.

ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना वाऱ्यावर सोडले,समरजितसिंह घाटगे यांचा घणाघात

सांगली लॉक डाऊन करायची का नाही यासंदर्भात आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. पण या बैठकीस सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर याना बोलावण्यात आले नाही. यावरून गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. मंत्री जयंत पाटील हा अत्यंत तज्ञ, बुद्धिवान आणि पंडित माणूस आहे, त्यांना आमच्या सारख्या साध्या कार्यकर्त्यांना सल्ला घ्यायचा नसेल. असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

तर , बैठकीत विरोधी आमदारांना बोलाव याच धारिष्ट जयंत पाटलांच्या मध्ये नाही अस मला वाटत जयंत पाटील याना 1 लाख लोकांनी निवडून दिले आहे अन मला ३० आमदारांनी पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद, विधनासभा असा भेदभाव करून राजकारण करू नये. अस देखील पडळकर म्हणाले आहे.

पवार हिंदूंचा अपमान करत असताना हिंदूहृदयसम्राटांचे वारसदार मूग गिळून गप्प का?