fbpx

VIDEO : माळी, धनगर, वंजाऱ्यांचंं आरक्षण काढा म्हणणाऱ्या सराटेंना ‘स्टंट’ करायचा काय ? – पडळकर

टीम महाराष्ट्र देशा : ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण अभ्यास न करता दिल्याने ते रद्द करण्याची मागणी याचिकेतून मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी केली आहे. या मागणी नंतर आता ओबीसी नेतेदेखील आक्रमक झाले असून अतिशय तीव्र शब्दात सराटे यांच्या मागणीला विरोध करत आहेत. ‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सराटे यांच्यावर शेलक्या शब्दात धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी टीका केली.

बाळासाहेब सराटे याचं याचिका दाखल करण्याच कामच काय आहे ? त्यांना याचा ‘स्टंट’ करायचा आहे का ? गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाव म्हणून आमचा पाठींबा होता त्यासाठी आम्ही मोर्चे देखील काढले मग त्यांना याचिका दाखल करण्याच कारण काय आहे ? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. ही याचिका दाखल करण्यामागे एकटे सराटे नाहीत त्यांच्यामागे अनेक जातीयवादी शक्ती आहेत फक्त त्यांचा चेहरा दिसत नाही. सराटे एक निमित्त असल्याचा घणाघात देखील पडळकर यांनी केला आहे.

दरम्यान, राज्याच्या विधिमंडळात मराठा आरक्षणाचं विधेयक आणून, ते मंजूर केल्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीने मराठा आरक्षणाचा कायदा राज्यात लागू करण्यात आला. मात्र, ओबीसी समाजाच्या काही मंडळींनी मराठा आरक्षणाला विरोध सुरु केला. त्यात गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे.यानंतर ‘ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण कोणतेही सर्वेक्षण किंवा अभ्यास न करता देण्यात आल्याने ते रद्दबातल करावे.’ , अशी मागणी करणारी जनहित याचिका बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे.