सांगली: सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या उदघाटनावरून वाद होताना दिसत आहेत. या स्मारकाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र त्याला आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते.
“अहिल्याबाई होळकरांचे स्मारक हे त्यांना राजकारणाचं केंद्र करायचं आहे, असा आरोप त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला. तसेच आमच्या पूर्वीच्या पिढ्या या साध्या भोळ्या होत्या, सांगेल ते ऐकणाऱ्या होत्या. मात्र आता आमची मूल हुशार झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा अजेंडा आता लोकांना कळतो आहे”, असं देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :