सांगली: सांगली येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पणाचा वाद पेटला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोध केला होता. त्यानंतर आमदार सदाभाऊ खोत यांनीही विरोध दर्शवला. स्मारकाच्या परिसरात गर्दी झाल्याने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान काही वेळापूर्वी स्थानिक मेंढपाळांच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आलेले आहे. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“जेव्हा हेतू स्वच्छ आणि स्पष्ट असतो, तेव्हा आंदोलनाला यश मिळत राहत. लोकांची भावना होती कि, मेंढपाळाच्या हस्ते उदघाटन व्हावं त्यामुळे ते झालेलं आहे”, अशी प्रतिक्रिया पडळकर यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या: