मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी पोलीस दलावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी अनेक घटनांचा उल्लेख देखील त्यांच्या भाषणात केला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र अत्यंत खालच्या थराला गेला आहे, असे म्हणत त्यांनी पोलिसांवरील आरोपांचा पाढा वाचायला सुरुवात केली. दौंडमध्ये डीवायएसपीच्या विरोधात एका महिलने विनयभंगाची तक्रार केली. तेव्हा एसपीने सांगितलं सेटलमेंट करा. त्याच महिलेने अधिवेशनावेळी अंगावर रॉकेल ओतून घेतल, अशी अवस्था कायदा आणि सुव्यवस्थेची झाली आहे.
“पुण्यातले एसपी पुढाकार घेत आहेत. हा माणूस कार्यालयातून बाहेरच पडत नाही. मी यांचे सर्व्हिस रेकॉर्ड बघितले. हा माणूस पोलिसांचा शत्रू आहे. एका कॉन्स्टेबल महिलेने पोलीस निरीक्षकाविरोधात लेखी तक्रार दिली. हा लैंगिक अत्याचार करतो, जातिवाचक शिव्या देतो. याविरोधात तिने धाव घेतली. मात्र अजूनही त्यात तक्रार दाखल झाली नाही. बारामतीतला शिंदे नावाचा एक पोलीस निरीक्षक एका तरूणीला घेऊन लॉजवर जातो. लॉजवर गेल्यावर ती तरूणी त्याचे चित्रिकरण करते. ते चित्रिकण सोशल मीडियावर व्हायरल होते. त्यानंतर त्याची बदली नेते करतात. पण त्याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही? आणि त्याने गुन्हा नसेल केला तर त्याची तडकाफडकी बदली का केली? कोण त्याला पाठिशी घालतंय? कशासाठी पाठिशी घालतंय? याचे उत्तर गृहमंत्र्यांनी जनतेला द्यावे”, असे म्हणत पडळकरांनी राज्य सरकार, गृहविभाग आणि पोलीस खात्यावर निशाणा साधला.
यानंतर पडळकरांनी अजून एक घटना सांगितली. एक मुलगी सरकारी कार्यालयात टेबलावर बसली आहे. एक माणून येतो तिचे चुंबन घेतो आणि पळून जातो. ती मुलगी पाठिमागे पळतेय शिव्या देत. मात्र अजूनही त्याचा तपास झाला नाही. त्याच्यात गुन्हा दाखल झाला नाही. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आले आहे. मात्र तरीही कुणतरी म्हणतं तो तिथं चोरी करायला गेला असेल. अशी उत्तरं देता? असे म्हणत त्यांनी पोलिसांवर टीका केली. तसेच या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी झाली पाहिजे, असेही पडळकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: