जर सगळं गावच करणार असेल तर सरकार काय करणार? ‘त्या’ स्पर्धेवरून पडळकरांचा हल्लाबोल

padalkar gopichand

मुंबई : राज्यासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. या लाटेत शहरांपेक्षा ग्रामीण भागात कोरोना संसर्ग अधिक बळावल्याचं दिसून येत आहे. शहरांमधला कोरोना आटोक्यात आल्यानंतर आता निर्बंध शिथिल केला जात असला तरी ग्रामीण भागामध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहेत. अशातच, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यातच आता राज्य सरकारने गाव कोरोनामुक्त करण्यासाठी एका स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या गावास तब्बल ५० लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये आणि 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. 6 महसुली विभागात प्रत्येकी 3 प्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षीसे दिली जाणार. यासाठी बक्षीसाची एकूण रक्कम 5 कोटी 40 लाख रुपये असेल.

राज्य सरकारने आयोजित केलेल्या या स्पर्धेवर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोविड आणि लॅाकडाऊनमुळे पुर्णपणे मोडला आहे. घरातील कित्येक कर्ते माणसं मृत्यूमुखी पडलीत. यांचे अश्रू पुसण्याऐवजी ग्रामीण जनतेच्या दुखाची थट्टा करणारी स्पर्धा भरवली जात आहे असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे.

या योजनेच्या व्यवस्थापणेचा सर्व 22 निकषांमध्ये या वसुली सरकारला शुन्य गुण आहेत आणि हे २२ निकष ठरवताना कुठेही या पथकांना व व्यवस्थापणेसाठी ‘निधी’ कोण देणार? ही बाब सोयीस्करपणे अंधारात ठेवली आहे.जर सगळं गावच करणार असेल तर सरकार काय करणार आहे? तुम्ही जबाबदारी दुसऱ्यावर सोपवून काय काम करणार आहात, अशी स्पर्धा या कामचुकार मंत्र्यांनी का भरवली आहे. नेहमी प्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून देण्याच्या उद्द्शाने ही कोरोनामुक्तीची स्पर्धा योजना केली आहे.

खरंतर या 50 लाखांच्या बक्षीसांबद्दलही मला साशंकता आहे. कारण ज्या पत्रकारांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे, त्यांना जीआर काढून पन्नास लाखांची मदत करतो सांगणाऱ्यांनी एक रूपायचीही मदत तर केलीच नाही पण कुटुंबियांना साधी भेटही दिली नाही. ही स्पर्धा म्हणजे अशाच यांच्या’भूलथापांच्या मालिकेचा’ एक भाग आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP