fbpx

याकूबला फाशी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उपराष्ट्रपती करणार का?

gopalkrushn gandhi sivsena
दिल्ली : याकूब मेननला फासाच्या तख्तापासून रोखण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावणाऱ्या गोपालकृष्ण गांधी यांना  उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यामागे काँग्रेसची कोणती मानसिकता आहे असा रोखठोक सवाल शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या विधानानंतर नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
 शिवसेनेने यूपीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वक्तव्यावर म्हटले आहे, ‘मॅडमजी (सोनिया गांधी) गोपाळकृष्ण गांधी यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमनच्या फाशीला विरोध केला होता. याकूबला फासाच्या तख्तापासून वाचवण्यासाठी त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. अशा व्यक्तीला उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी देणे ही कोणती मानसिकता आहे? अशा व्यक्तीला तुम्ही उपराष्ट्रपती बनविणार आहात का?आम्ही विरोध केला नसता, मात्र जेव्हा देशहिताचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा विषय येतो तेव्हा विचार करावा लागतो. याकूबने दहशतवाद्यांना साथ दिली होती. गोपाळकृष्ण गांधींनी अशा व्यक्तीची फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठी सुरु झालेल्या मोहिमेचे नेतृत्व केले होते. शिक्षा रद्द व्हावी यासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहिले होते.’
शिवसेनेने पुरावे द्यावे:काँग्रेस
 शिवसेनेच्या या घणाघाती हल्ल्याला काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी आव्हान दिले आहे. त्या म्हणाल्या गोपाळकृष्ण गांधी यांच्याबद्दल बोलण्यापूर्वी शिवसेनेने पुरावे द्यावे.