पुण्यामध्ये पुन्हा एकदा गुंडाचा हैदोस; 16 गाड्यांच्या काचा फोडल्या

पुणे: पुण्यातील अप्पर इंदिरानगर भागामध्ये टोळक्याने १६ गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास टोळक्याने अप्पर इंदिरानगर बस डेपो समोरील गाड्यांची तोडफोड केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास हि सर्व घटना घडली आहे. पद्मावती नगर, गणेश नगर, श्रेयस नगर, शेळके वस्ती हा सर्व प्रकार घडला. वर्दळ कमी झाल्यांनतर टोळक्याने रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचाकी गाड्या, टेम्पो, रिक्षा यांच्या काचा फोडून प्रचंड नुकसान केले. दरम्यान, या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.