मुळशीत सराईत गुन्हेगाराची हत्या

goon pappu satpute murder

पुणे : मुळशी तालुक्यात पूर्ववैमनस्यातून एका सराईत गुंडाची हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी (14 सप्टेंबर) रात्री 8.15 वाजता हि घटना घडली. मुळशीमधील पौड-लोणावळा रस्त्यावर असणाऱ्या कोळवण गावाजवळ हि हत्या करण्यात आली असून मयताचे नाव पप्पू सातपूते (रा. अकोले, वय 25) असे आहे.

मयत सुशांत उर्फ पप्पू लक्ष्मण सातपुते हा मुळशी परिसरातील कुख्यात गुंड होता. सातपुतेवर खुनाचा प्रयत्न करणे आणि मारामारीचे अनेक गुन्हे दाखल होते. काही दिवसांपूर्वीच त्याला तडीपार करण्यात आले होते.

गुंड पप्पू सातपुते याच्या हत्या प्रकरणात कोळवन परिसरातीलच काही युवकांचा हात असल्याची प्राथमिक माहिती येत आहे. दरम्यान त्याच्या हत्येच्यावेळी सोबत असलेल्या रवींद्र सातपुते याच्यावरही हल्ला करण्यात आला असून तो जखमी झाला आहे.