Google- गुगलची नोकर्‍यांसाठी ‘गुगल हायर’ वेबसाईट

गुगलने ‘गुगल हायर’ या नावाने स्वतंत्र जॉब अ‍ॅप्लीकेशन ट्रॅकींग प्रणाली सादर केली असून या माध्यमातून लिंक्ड-इनला स्पर्धा निर्माण होणार आहे.

 

सध्या जगभरात प्रोफेशनल नेटवर्कींगमध्ये लिंक्ड-इन हे संकेतस्थळ आघाडीवर आहे. आता ‘गुगल हायर’ या नावाने नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे. यात विविध कंपन्या त्यांना हव्या असणार्‍या जागांची माहिती देणार असून दुसरीकडे जॉबसाठी इच्छुक असणारेही या माध्यमातून नोकरी मिळवू शकतील.

 

ही वेबसाईट सध्या तरी प्राथमिक अवस्थेत असून यावर फार थोड्या कंपन्यांच्या जॉबबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र लवकरच यावर जगभरातील कंपन्यांच्या ‘प्लेसमेंट’बाबत माहिती देण्यात येणार आहे. हे संकेतस्थळ ‘बीबॉप’ने विकसित केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या कंपनीला २०१५ मध्ये गुगलने अधिग्रहीत केले आहे.