गुगलचे ‘व्हॉइस सर्च’ आता ३० भाषांमध्ये !

नवी दिल्ली : गुगलने इंग्रजी आणि हिंदी भाषेव्यतिरिक्त अन्य ३० भाषांमध्ये व्हॉइस सर्च सुरु केले. यामध्ये मराठी,बंगाली, गुजराती, कन्नड,मल्याळम, तामिळ, तेलुगु आणि ऊर्दू या ८ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी व्हाईस सर्च करण्यासाठी केवळ हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा पर्याय होता. ही योजना लवकरच आयओएस प्लॅटफॉर्मवर सुरु करणार असून हा व्हाइस सर्च ११९ भाषांना सपोर्ट करतो असे कंपनीकडून सांगण्यात आले. तसेच हा व्हॉइस सर्च गोबोर्ड या ॲपला देखील संलग्न करणयात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील अनेक वापरकर्ते आपल्या मातृभाषेचा वापर करण्यास सर्वाधिक पसंती दर्शवतात. व्हाइस सर्चमुळे वेळेची बचत होते, असेही कंपनीने सांगितले.