fbpx

Google- गुगलचे इन्स्टंट सर्च होणार बंद

google instant search

गुगलने आपल्या डेस्कटॉप आणि स्मार्टफोन अ‍ॅपवर असणारे इन्स्टंट सर्च हे फिचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुगलवर सर्च करतांना आपण शब्द टाईप करण्यास प्रारंभ करताच त्याच्याशी संबंधीत शब्द आपल्याला दिसतात. यामुळे सर्च करणार्‍या युजरचा वेळ वाचत असल्याने हे फिचर चांगलेच लोकप्रिय झाले होते.  मात्र स्मार्टफोनवर शब्द टाईप करतांना हे ‘सजेशन टुल’ अनेकदा गैरसोयीचे ठरत असल्याची तक्रार अलीकडच्या कालखंडात करण्यात येत होती. यातच गुगलवरील ५० टक्क्यांपेक्षा जास्त सर्च ही मोबाईलच्या माध्यमातून करण्यात येत असल्यामुळे या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे अशक्य होते. याशिवाय अनेकदा या माध्यमातून अतिशय विचीत्र सर्च टर्म सुचविण्यात येत असल्यामुळे वादही निर्माण होत होते. यामुळे इन्स्टंट सर्च हे फिचर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.