गुगल पिक्सेलवर 29 हजार रुपयांची सूट

मुंबई : गुगलचा पिक्सेल या 57 हजार रुपये किंमतीच्या फोनवर सध्या 29 हजार रुपये एवढी सूट मिळवता येऊ शकते. फ्लिपकार्टवर 20 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर आहे, तर सिटी बँकेच्या डेबिट कार्डवर 9 हजार रुपये कॅशबॅक मिळत आहेत.

गूगलच्या पिक्सेल फोनची बॅटरी आणि कॅमेरा हा त्याचं खास आकर्षण मानलं जातं. बॅटरी केवळ 15 मिनिटात चार्ज होते, तर 7 तासांचा बॅकअप आहे. व्हिडिओ क्वालिटीसाठी यामध्ये व्हिडिओ स्टेबिलायझर देण्यात आलं आहे. पिक्सलच्या कॅमेऱ्यातून कमीत कमी सेकंदात फोटो काढता येतील. तसंच HDR+ पेक्षा पिक्सलच्या कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली असेल, असा दावाही गुगलने केला आहे.

 

फीचर्सः

  •  अॅल्यूमिनिअम बॉडी
  • 2×2.15GHz आणि 2×1.6GHz क्वाड कोअर प्रोसेसर
  • 4GB रॅम
  • 32GB स्टोरेज
  •  12 मेगापिक्सेलचा सेंसर
  • 2700mAh आणि 3450mAh क्षमतेची बॅटरी (दोन व्हर्जन)