युट्यूब प्रेंमींसाठी ‘युट्यूब गो’

youtbe go,

वेब टीम :युट्यूबची लोकप्रियता आपणास माहीतच आहे .कोणताही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण युट्यूबची मदत घेतो.मनोरंजन,खेळ,राजकारण यापासून कोणत्याही क्षेत्राशी संबंधित व्हिडिओ आपणास युट्यूब लगेच मिळतो . आता गुगलने युट्युब प्रेमींसाठी एक नवीन अॅप आणलं आहे.युट्यूब गो नावाचे हे अॅप युझर्सच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे .

विविध पर्याय
व्हिडिओ पाहायचा आहे की डाऊनलोड करायचा आहे, याबाबत विविध पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही पाहत असलेला व्हिडीओ डाऊनलोड होण्यापूर्वी त्याचा प्रीव्यूव्ह बघू शकता. त्यामुळे तुम्ही  शोधत असलेला व्हिडिओ तोच आहे का? याबाबत खात्री करता येते. तसंच या व्हिडिओवर आपण किती एमबी डेटा खर्च केले हेही इथे दिसतं.

Loading...

ऑफलाईन व्हिडिओ शेअरिंग
डाऊनलोड केलेला व्हिडिओ तुम्ही तात्काळ मित्रांना पाठवू शकता. अगदी शेअर इटसारखं व अत्यंत कमी वेळेत हा व्हिडिओ शेअर होतो. तसंच हे शेअर करताना तुमचा डेटा वापरला जाणार नाही, याची पुरेपूर काळजी या अॅपने घेतली आहे.म्हणजेच ऑफलाईन व्हिडिओ शेअरिंग करता येणार आहे.

व्हायरसचा धोका नाही 
याआधी युट्यूबवरील व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करावा लागत असे. यातून व्हायरसचा धोका नेहमीच असायचा. आता या सर्व गोष्टींना कायमचा चाप बसणार आहे. हे अॅप फक्त ९ एमबीचं आहे. त्यामुळे इन्स्टॉल केल्यावरही ते जास्त जागा वापरणार नाही आणि फोन हँग होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.

कमी स्पीडमध्येही डाऊनलोड करता येणार

युट्यूबवरील कोणताही व्हिडिओ आपण अगदी कमी स्पीड असलेल्या इंटरनेटवरून ही डाऊनलोड करू शकतो. तसंच तो नंतर कितीही वेळा पाहू शकतो. त्यासाठी अतिरिक्त चार्जेस लागत नाहीत. हा विडिओ आधी असलेल्या युट्यूबच्या ऑफलाइन फीचर्ससारखा काही दिवसानंतर निघून जात नाही.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'