‘गुगल फॉर जॉब्स’ नोकरी शोधणाऱ्यांसाठी गुगलची सेवा

Google to launch a jobs search engine

वेब टीम- गुगलने ‘गुगल फॉर जॉब्स’  एक खास सेवा सुरू केली आहे.  नोकरीच्या शोधणाऱ्यांसाठी गुगलने नवे  फीचर आले असून याद्वारे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांचे काम सोपे व्हावे हा गुगलचा प्रयत्न आहे.

हे फीचर इंग्रजी भाषेतच उपलब्ध असणार आहे. TimesJobs, Shine.Com आणि LinkedIn यांसारख्या वेबसाईट सोबत गुगलने भागीदारी केली आहे आणि काही राज्य सरकारांसोबतही गुगलची बोलणी सुरू आहेत माहिती आहे.

तुम्हाला जॉब सर्च करायचा असेल तर गुगल सर्चमध्ये Jobs near me किंवा Jobs for fresher टाकल्यास तुमच्या समोर गुगलचा ‘गुगल फॉर जॉब्स’चा डॅशबॉर्ड सुरू होईल. येथे नोकऱ्यांची यादी दिसेल, तेथे क्लिक करुन तुम्ही नोकरीसाठी अर्ज करु शकतात. जॉब व्हॅकेन्सीवर क्लिक केल्यास तुमच्यासमोर अनेक पर्याय दिसतील.

नोकरी शोधताना प्रेफेरेंस सेट करु शकतात. म्हणजे पार्ट टाईम किंवा फुल टाईम जॉब, लोकेशन, जॉब टायटल आणि अनुभव आदी गोष्टी तुम्हाला हव्या त्याप्रमाणे सेट करता याव्यात यासाठी कंपनीने स्मार्ट फिल्टर दिले आहे. तसेच यामध्ये अलर्ट फीचर देखील आहे, म्हणजे तुम्ही शोधत असलेल्या नोकरीसारखी एखादी संधी असेल तर तुम्हाला ईमेल पाठवून माहिती दिली जाईल.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...