fbpx

Google Search- गुगल सर्चमध्ये दिसणार ऑटो-प्ले व्हिडीओ

google auto play video news

गुगल या सर्च इंजिनच्या रिझल्टमध्ये आता ऑटो-प्ले होणारे व्हिडीओ दिसणार आहे.  फेसबुक आणि ट्विटरच्या न्यूज फिडवरही व्हिडीओ आपोआप सुरू होत आहे. मात्र आता गुगल हे आघाडीचे सर्च इंजिनदेखील ऑटो-प्ले होणार्‍या व्हिडीओचा पर्याय घेणार आहे. यामुळे काही ग्राहकांना त्रास हि होऊ शकतो.

गुगलवर चित्रपट वा मालिकेबाबत सर्च केल्यास नियमित रिझल्टसोबत उजव्या बाजूस त्याच्याशी संबंधीत व्हिडीओ दिसू शकणार आहे. यावर क्लिक न करतांनाही ते आपोआप सुरू होतात. अर्थात याला आवाज नसतो. म्हणजे ते म्युट स्वरूपात काही काळापर्यंत सुरू राहतात. संगणक आणि स्मार्टफोन या दोन्ही प्रकारांमध्ये गुगल या फिचरची चाचपणी करत आहे. काही युजर्सला हे फिचर दिसू लागले असून काहींना येत्या काळात दिसणार आहे.