पुणे: आपल्या सर्वांनाच सावित्रीबाई फुले माहीत आहेत. पहिल्या भारतीय महिला शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. ३ जानेवारीला त्यांची जयंती संपूर्ण भारतात साजरी केली जाते. मुलींसाठी शाळा सुरू करणे हे अत्यंत महत्वाचे आणि त्याकाळी अवघड असे काम त्यांनी केले. हे सगळंच आपल्याला माहीत आहे. पण आपल्याला हे माहीत आहे का की यांच्या सोबत आणखी एक महिला होती जीने या शिक्षणाच्या लढ्यात सावित्री बाईंना साथ दिली. त्या आहेत भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातीमा शेख. आज दिनांक ९ जानेवारी रोजी त्यांची जयंती साजरी केली जाते.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात १८४८ मध्ये सुरु केलेल्या पहिल्या शाळेत फातिमा शेख (Fatima Sheikh) शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केल्यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना घर सोडावं लागलं होतं त्यावेळी फातिमा शेख यांचा भाऊ उस्मान शेख यांनी त्यांना राहण्यास जागा दिली होती. त्याकाळी जसा सावित्रीबाई फुले यांना त्रास सहन करावा लागला होता तसाच त्रास फातिमा शेख यांना देखील सहन करावा लागला होता.
फातिमा शेख यांनी आयुष्यभर समता या तत्वाच्या प्रसारासाठी काम केलं. त्यांनी दारोदार जाऊन शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचं काम केलं. वर्ग, धर्म आणि लिंग मुळे शिक्षण नाकारलं गेलेल्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी काम केलं. एकदा सावित्रीबाई फुले यांनी स्वत:च्या तब्येतीविषयी जोतिबा फुले यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात सावित्रीबाई फुले यांनी “फातिमाला त्रास पडत असेल पण ती काही बोलणार नाही” असं लिहिलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सावधान! आता डेल्टा आणि ओमायक्रॉनचे मिश्रण असलेला ‘डेल्टाक्रॉन’ आलाय
- गोव्यात काँग्रेसच्या सक्षम नेतृत्वाअभावी १७ चे २ आमदार झाले-संजय राऊत
- “तुम्ही ज्या रुग्णालयाचे उद्घाटन करताय ते आम्ही यापूर्वीच केलेले”, ममतांचे मोदींसमोरच विधान
- ‘जिवाची काळजी असेल तर…’ पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी साधला मोदींवर निशाणा
- “गोव्यातील निवडणुकीत पैशांचा पाऊस!”, राऊतांचा रोखठोकमधून गडकरींवर निशाणा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<