Share

Google Smartphone Launch | Google ने लाँच केले ‘हे’ नवीन स्मार्टफोन

टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशात सगळीकडे सणासुदीची खरेदी विक्री सुरू आहे. प्रत्येक कंपनी या प्रसंगाचा फायदा घेत आपले नवनवीन मॉडेल बाजारात लाँच करत आहे. आणि याचाच फायदा घेत Google ने आपला स्मार्टफोन लाँच केले आहे.

गुगलचा Made by Google बहुप्रतिक्षित कार्यक्रम काल 6 ऑक्टोबर रोजी पार पडला. या कार्यक्रमात गुगलने आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला. कंपनीने Pixel 7 सिरीज मधील Google Pixel 7 आणि Google Pixel 7Pro स्मार्टफोन लाँच केले. या स्मार्टफोन सोबतच गुगलने आपले इतरही प्रॉडक्ट लाँच केले. हा कार्यक्रम न्यूयॉर्क सिटी मध्ये आयोजित करण्यात आला होता कंपनीने या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग यूट्यूब चैनलव्दारे केले होते.

Google Pixel 7

गुगलचा हा स्मार्टफोन Android 13 वर काम करतो. Google Pixel 7 या स्मार्टफोन 6.32inch 90Hz पोल्ड फ्लॅट स्क्रीनसह 2400×1080 रिझोल्युशन सोबत उपलब्ध आहे. या फोनच्या स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 12GB LPDDR5X RAM असून यामध्ये 128GB/256GB UFS 3.1 इंटरनल स्टोरेज आहे. या स्मार्टफोन मध्ये 50MP ऑटो फोकस + 12MP अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेरा आहे. त्याचबरोबर 10.8MP सेल्फी कॅमेरा आहे. या फोनच्या बॅटरी बद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये 4,355mAh बॅटरी आहे जी एक्स्ट्रीम बॅटरी सेव्हरवर 72 तासापर्यंत चालते. Google Pixel 7 ची किंमत 59,999 एवढी आहे. ही किंमत Flipkart वर आणखी कमी होऊ शकते.

Pixel 7 Pro

गुगलचा Google Pixel 7 Pro देखील Android 13 वर काम करतो. हा फोन 6.7inch 120Hz पॉल्ड फ्लॅट स्क्रीन + 3120×1440 रिझोल्युशनसह उपलब्ध आहे. हा फोन गोरिला ग्लास 7 Victus Glass सह सुरक्षित आहे. या फोनच्या स्टोरेज बद्दल जर बोलायचं झाले तर, यामध्ये 12GB LPDDR5X RAM असून 128GB/256GB UFS 3.1 इंटरनल स्टोरेज आहे. यामध्ये 50MP ऑटो फोकस + 12 MP अल्ट्रा-वाईड अँगल + 48MP कॅमेऱ्यासह हा फोन सुसज्ज आहे. या स्मार्टफोन मध्ये 5,000mAh बॅटरी उपलब्ध आहे.या फोन किंमत 84,999 रुपये एवढी आहे.

Google चे दोन्ही ही स्मार्टफोन 13 ऑक्टोबर पासून खरेदीसाठी उपलब्ध होतील. काही काळापर्यंत गुगलने या दोन्ही स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर देखील दिल्या आहेत. Flipkart वर या फोनच्या किमतीत आणखी कमी होऊ शकतात कारण एक्सचेंज डिस्काउंट बोनस या फोनवर मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशात सगळीकडे सणासुदीची खरेदी विक्री सुरू आहे. प्रत्येक कंपनी या प्रसंगाचा फायदा घेत आपले नवनवीन …

पुढे वाचा

Mobile

Join WhatsApp

Join Now