fbpx

गुगल हँगाऊटचे झाले विभाजन

गलने हँगाऊट सेवेला विभाजीत करण्यात निर्णय जाहीर केला असून आता ही सेवा ‘मीट’ आणि ‘चॅट’मध्ये विभाजीत झालेली आहे. हे दोन्ही अ‍ॅप ‘जी-सुट’च्या अंतर्गत युजर्सला सेवा देणार आहेत.
गुगलची ‘मीट’ ही सेवा व्यावसायिकांना अतिशय उत्तम दर्जाच्या व्हर्च्युअल बिझनेस मिटींगसाठी उपयोगात येणार आहे. यात एकाच वेळी 30 युजर्स हे एकमेकांशी संवाद साधू शकतील. यासाठी गुगलने अमर्याद क्लाऊड सेवाही देऊ केली आहे. तर गुगलच्या ‘चॅट’ या सेवेत नावातच नमूद असल्यानुसार बिझनेस चॅटींगची सेवा देण्यात आली आहे. यात एखादी कंपनी वा संस्थेचे कर्मचारी एकमेकांशी सुलभ व गतीमान पध्दतीने संवाद साधू शकतील. अद्याप ‘मीट’ आणि ‘चॅट’ हे अ‍ॅप सुरू करण्यात आले नसून येत्या काही आठवड्यांमध्ये ते प्रारंभी अँड्रॉइड प्रणालीसाठी लाँच करण्यात येणार आहे.