सावित्रीबाई फुले यांची आज 186 वी जयंती

भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज (3 जानेवारी) 186 वी जयंती.

सावित्रीबाई फुले यांचे आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षण देण्यासाठी अर्पण केले. ब्रिटीश राजवटीत अपवाद वगळता संपूर्ण देश निरक्षर होता. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831मध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. त्यांचा विवाह जोतिबा फुले यांच्याशी झाला.

1848 मध्ये त्यांनी भारतातील पहिली महिला शाळा पुणे येथे सुरू केली. त्याला बालिका विद्यालय असे नाव दिले. पूढे त्यांनी आपल्या मेहनत आणि चिकाटीच्या बळावर 18 महिला शाळा सुरू केल्या. तसेच, आपले संपूर्ण शिक्षण महिलांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी वाहिले.

त्यांच्या जयंतीनिमित्त इंटरनेट जगतातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगलनेही त्यांना डूडल बनवून सलाम केला आहे.