fbpx

गुगलने ‘फादर्स डे’च्या निमित्ताने खास डुडल

आज ‘फादर्स डे’ .गुगल वेगवेगळ्या दिवसांचे सेलिब्रेशन आपल्या हटके डुडलच्या माध्यमातून करत असते . आजही गुगलने ‘फादर्स डे’च्या निमित्ताने खास डुडल तयार करून जगभरातील पित्यांविषयी  कृतज्ञता व्यक्त केली आहे.  गुगलने आज जे  खास डुडल तयार केले  त्यातून एक वृक्ष आपल्या छोट्या रोपट्याची कशी काळजी घेतो हे दाखवण्यात आले आहे. याच वृक्षाप्रमाणे प्रत्येक पिता आपल्या पाल्याची काळजी घेतो तसेच त्याचे आयुष्य योग्य पद्धतीने घडावे यासाठी धडपडत असतो असाच संदेश या डुडलच्या माध्यमातून देण्यात आला आहे.