गुगल डूडलची मल्लिका ए गझलला सलामी

गुगल आपल्या डूडल द्वारे नेहमीच महान लोकांना सलाम करीत असते. गुगल डूडलमुळे अनेक महान व्यक्तीचे कार्य पुन्हा प्रकाशझोतात येते. नवीन पिढीला महान लोकांच्या कार्याची माहिती होते.मल्लिका ए गझल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेगम अख्तर यांना जयंती दिनी गुगलने डूडलद्वारे सलामी दिली आहे.

‘ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया.’, ‘मेरे हम नफस, मरे नवा, मुझे दोस्त बन के दगा न दे’ यासारख्या अजरामर गझल देणाऱ्या बेगम अख्तर यांची आज 103 वी जयंती आहे. त्याच निमित्ताने गुगलने भारताच्या या गजलसम्राज्ञीचं डूडल बनवलं आहे.बेगम अख्तर यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1914 रोजी झाला. गझल, दादरा आणि ठुमरी या भारतीय संगीतात त्यांचा हातखंडा होता.

bagdure

आपल्या गाण्यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. पाकिस्तानमध्येही त्यांचे अनेक चाहते आहेत.बेगम अख्तर यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. याशिवाय त्यांनी संगीत क्षेत्रातील मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कारही पटकावला होता.

बेगम अख्तर यांनी पहिल्यांदा कोलकाता इथं स्टेजवर आपलं गाणं सादर केलं होतं. बिहारच्या भूकंप पीडितांसाठी हा कार्यक्रम होता

 

Comments
Loading...