गुगलने दिला चीनला दणका, २५०० हून अधिक यूट्यूब चॅनेल डिलीट केले

youtube

नवी दिल्ली- भारत सरकारने 59 चिनी अ‍ॅप्स बॅन केल्यानंतर काही दिवसांपूर्वी चीनवर दुसऱ्यांदा डिजिटल स्ट्राइक करताना अजून 47 अ‍ॅप्स बॅन केले होते. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, या 47 अ‍ॅप्स मध्ये बाइटडान्सच्या व्हिडिओ एडिटिंग अ‍ॅप्स CapCut आणि शाओमी ब्राउजर अ‍ॅप्स सह जवळपास 15 नवीन अ‍ॅप्सचा समावेश आहे.

एका बाजूला भारत तर दुसऱ्या बाजूला अमेरिका देखील चीनवर नाराज आहे. आता Google ने देखील चीनला दणका दिला आहे. चीन संबंधित जवळपास २५०० हून अधिक यूट्यूब चॅनेल डिलीट केले आहेत. या चॅनेल्सवरून भ्रमित माहिती पसरवली जात होती. त्यामुळे गुगलने व्हिडिओ शेयरिंग प्लॅटफॉर्मवरून हटवले आहे.महारष्ट्र टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

यूट्यूबने सांगितले की, चॅनेल्सवर साधारणपणे स्पॅमी, नॉन पॉलिटिकली कंटेंट पोस्ट केले जात होते. परंतु, यात पॉलिटिक्स संबंधित काही माहिती होती. गुगलने आपल्या भ्रामक माहितीसाठी चालणाऱ्या ऑपरेशनच्या तिमाही बुलेटिनमध्ये ही माहिती दिली. गुगलने या चॅनेलची नावे उघड करण्यास टाळले आहे. सोशल मीडिया अॅनालिटिक्स कंपनी Graphika ने एप्रिल मध्ये डिसइन्फर्मेशन मोहीम अंतर्गत याची ओळख पटवली होती.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –