आशा आहे की एक दिवस मी भारतात परत येईल आणि….– सुंदर पिचाई

google-ceo-sundar-pichai-says-hopefully-i-will-return

टीम महाराष्ट्र देशा- जगात कोठीही जा, कितीही पगार कमवा किवां कितीही मोठ पद भूषवा आपल्या मातुभूमीची ओढ आपल्याला लागतेच. असचे काही जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगल कंपनीचे सी.ई.ओ सुंदर पिचाई यांच्याशी घडले आहे.

माझ्या मनात रोज एक विचार येतो. सिलिकॉन व्हॅली मध्ये बसून कोणी एक इंजिनिअर वेगळा शोध लावत असेल, आणि काही दिवसात तो आपल्या समोर येईल व आपल्या पुढे निघून जाईल. याकरता आपण रोज नवीन काहीतरी करायला हव. यातूनच नवीन सिस्टम निर्माण होईल.चांगली टीम आणि उत्तम टीम वर्क असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता.कोणत्याही एकाच व्यक्तीला स्टार करणारा कल्चर जास्त दिवस चालू शकत नाही.

वर्तमानासोबत आपण भविष्याचा देखील विचार करायला हवा. आता मोबाईल टेक्नोलॉजी चालू आहे येणाऱ्या काही दिवसात आर्टिफिशियल इंटेलिजेंस चा ट्रेंड सुरु होईल. आपल्याला त्या दृष्टीने विचार करायला हवा.
आपल्या आधीच्या पिढीने हे बदल स्वीकारायला हवे कारण विजुअल इन्फॉर्मेशन चा जमाना आहे. जर बदल स्वीकारले तरच प्रगती होणे शक्य आहे.

मला अजूनही माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवते आमच्या घरी ज्या दिवशी फ्रीज आला त्या दिवशी माझ्या आईचे काम अर्ध्याहून जास्त कमी झाले होते. तेव्हा खऱ्या अर्थाने मी टेक्नोलॉजीची जादू अनुभवली. आणि तेव्हाच मला समजले आयुष्य सुंदर व सोप्प बनविण्यासाठी टेक्नोलॉजी शिवाय पर्याय नाही.मी एक दिवस भारतात पुन्हा परतेल आणि देशाला नक्कीच काही वेगळ देईन.