डुडलच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !

नवी दिल्ली: देश आज ७१ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असतांना डूडलनेही आपल्या खास शैलीत देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने या खास डुडलच्या माध्यमातून देशातील प्रत्येक कोनाकोप्याचे प्रतिबिंब उमटवले आहेत. गुगलने डूडलमध्ये नारंगी रंगामध्ये संसदेचे चित्र रेखाटले असून संसदभवनाच्या खालच्या बाजूस दोन मोर काढले आहेत. तसेच चित्राच्या मध्यभागी अशोकचक्र रेखाटल्याने डूडल आकर्षक दिसत आहे.