‘गुगल बॉय ऑफ महाराष्ट्रला’ इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनंतर आता लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे वेध…

एकाच कुटुंबातील पाच बुद्धिवंत. ..

ज्ञानेश्वर राजुरे : अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर उदगीरच्या मयूर जगळपुरे सह अन्य चार विद्यार्थ्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अवार्ड मिळवला आहे.  गणित आणि बुद्धिमत्ता विषयातील अनेक प्रश्न वेळेत सोडवल्याने हा पुरस्कार मिळाला आहे. आता मयूरला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे वेध लागल आहे. त्याला भविष्यात IAS बनायचं आहे.

गुगल बॉय ऑफ महाराष्ट्र अशी ओळख असणारा मयूर मनोज जगळपुरे या विद्यार्थ्याची 2013 मध्ये ‘इंडिया न्युज’ या न्यूज चॅनल वर जिनियस टेस्ट शो साठी निवड झाली. या माध्यमातून तो जगभरात पोहचल्याच  अनेकांनी पाहिल आहे. त्यावेळी तो सहावीत होता लहान असल्यापासूनच अभ्यासाची आवड आणि जिद्द तसेच इतरां पेक्षा काही तरी वेगळं करण्याची आवड असल्याने तो असामान्य बुद्दीमतेचा असल्याची ओळख झाली आहे. एप्रिल 2017 चा  इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अवार्ड मयूरला ठाणे येथे मिळाला असून त्याला आता लिम्का बुक ऑफरेकॉर्डचे वेध लागलं आहे. सध्या तो उदगीरच्या शामल मेमोरियल हायस्कूल मध्ये इयत्ता 9 मध्ये  शिक्षण घेत आहे.  या किताब मिळाल्यानतर महाराष्ट्र देशाच्या प्रतिनिधींशी बोलताना ” मला माझ्या वयाच्या 22 व्या वर्षी  IAS व्हायचं आहे आणि लोकांची सेवा करायची आहे” अशा भावना त्यांन  व्यक्त केल्या आहेत.

मयूर सध्या  9 वी मध्ये जरी शिक्षण घेत असला तरी तो इयत्ता 10 वि बोर्डच्या प्रश्न पत्रिका सोडवतो आहे, त्याची उत्तरपत्रिकेची तपासणी संबंधी विषयाच्या शिक्षकांडून तपासली असता 95% उत्तरे बरोबर असल्याचा शेरा त्याच्या सराव उत्तरपत्रिकेवर दिसून येतो. ठाणे या ठिकाणी झालेल्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड च्या स्पर्धे वेळी मयूर ने दोन अवार्ड मिळवलेत. एक सामान्यज्ञाना वर आधारित एका तासात 1800 प्रश्नची उत्तरे अचूक दिलीत तर दुसरा रुबिक्स क्यूब ची रंग संगती अचूक बनवण्याचे बौद्धिक कौशल्य 39 सेकंदात पूर्ण केला आहे  ते हि डोळ्यावर पट्टी बांधून

मयूरच्या सोबतच  इयत्ता 7 वी मध्ये शिक्षणघेत असलेली त्याची बहीण गायत्री मनोज जगळपुरे ब्लाईंड फोल्डेड वर्डस रिडींग ( डोळ्यवार पट्टी बांधून अंध पद्धतीने) एका मिनीट मध्ये 105 शब्द वाचन कौशल्य

तर श्रेया महेश जगळपुरे हिने डोळ्यवार पट्टी बांधून एका मिनिट मध्ये 25 दोन अंकी गुणाकार करण्याची किमया साधली. तर इयत्ता  5 वि वर्गात असणारा संस्कार गणेश जगळपुरे याने हि डोळ्यवार पट्टी बांधून एका मिनिट मध्ये 22 दोन अंकी वजाबाकी केली आहे. त्याच प्रमाणे श्रुती महेश जगळपुरे हिने एका मिनिट मध्ये 22 दोन अंकी बेरीज करण्याची करण्याची किमया साधली.

ब्लाईंड फोल्डेड वर्डस रिडींग ( डोळ्यवार पट्टी बांधून अंध पद्धत ) या विषयी माहिती विचारली असता आर्ट ऑफ लिविंग चे श्री श्री रवी शंकर यांच्या शिकवण चे इंटयुशन (आत्मप्रेरणा) पद्धतीने पंच ज्ञानेंद्रिय ( डोळे , कान, नाक, त्वचा, जीभ) आणि मन या मुळे पिट्युरियल ग्रँड हार्मोन्स सिक्रेट करतात त्यामुळे हे कौशल्य प्राप्त झाल्याचे या विद्यार्थ्यांनी  सांगितलं.त्यामुळे समाजातील इतर मुलं हि अभ्यास आणि आपल्या कौशल्याच्या जोरावर सामान्यातल्या सामान्य विद्यार्थी देखील  मोठं यश प्राप्त करू शकतात हेच या वरून दिसून येते.

 

Comments
Loading...