fbpx

सद्भावना रॅलीतील एकतेच्या आवाजामुळे दंगलखोरांच्या कानठळ्या बसतील ; विश्वास नांगरे पाटील

Vishwas-Nangre-Patil

सांगली : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीनंतर महाराष्ट्र भर हिंसाचार झाला. दरम्यान सांगली शहरात देखील दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पहिल्यांदाच जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगली शहरात सद्भावना रॅली काढण्यात आली. रॅलीतील एकतेच्या आवाजामुळे दंगल खोरांच्या कानठळ्या बसतील. असे विश्वास नांगरे पाटील म्हणाले.

कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर गढूळ झालेलं सामाजिक वातावरण पूर्वपदावर आणण्यासाठी सांगलीत आज सद्भवना एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला सांगलीचे जिल्हाधिकारी तसंच विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील उपस्थित होते. विश्वास नागरे पाटील म्हणाले, नवीन पिढी आम्हाला दंगली नको म्हणून विनंती करते आहे. समाजात एकोपा नांदावा तसेच विद्यार्थाला भविष्य घडवायचं आहे. तर या विद्यार्थांचा आवाज जनतेपर्यंत पोहचावा म्हणून सद्भावना एकता रॅलीचं आयोजन करण्यात आले.