खुशखबर! नांदेड विभागात एप्रिल महिन्यापासून सहा गाड्या धावणार

nanded railway station

नांदेड : येत्या एप्रिल महिन्यापासून नांदेड विभागातून विविध भागात जाणाऱ्या सहा नविन रेल्वे सुरु होणार आहेत. यामुळे नांदेड विभागात प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. मात्र या सर्व गाड्या विषेश असल्याने प्रवाशाना भुर्दंड सहन करावे लागतील. यातील तीन गाड्या औंरगाबाद मार्गे धावणार आहेत.

रेल्वे बोर्डाने घोषित केल्यानुसार नांदेड ते निझामुद्दीन (०२७५३) ही साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ६ एप्रिल पासुन दर मंगळवारी नांदेड येथून सकाळी ९ वाजता सुटेल आणि निझामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. तसेच विषेश साप्ताहिक नांदेड ते औरंगाबाद एक्स्प्रेस (०७६१९) २ एप्रिल पासुन दर शुक्रवारी नांदेडहून सकाळी ११.५० वाजता सुटेल व दुपारी ४.५० वाजता औरंगाबाद स्थानकावर पोहोचेल. तर रेनीगुंटा ते औरंगाबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (०७६२२) शनिवारी ०३ एप्रिल पासून रेनीगुंटा येथून दर शनिवारी रात्री ९ वाजुन २५ मिनिटांनी सुटून औरंगाबाद येथे रविवारी रात्री १० वाजुन १५ मिनिटांनी पोहोचेल.

नांदेड ते आदिलाबाद विशेष एक्स्प्रेस (०७४१०) ही गाडी १ एप्रिल पासून दररोज नांदेड येथून दुपारी ३ वाजुन ०५ मिनिटांनी सुटेल आणि आदिलाबाद येथे त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजुन ५५ मिनिटांनी पोहोचेल. नांदेड ते सत्रागच्ची विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (०२७६७) ही गाडी ०५ एप्रिल सोमवार पासून नांदेड येथून दुपारी ३ वाजुन २५ मिनिटांनी सुटून सत्रागच्ची (कोलकत्ता) येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजुन २० मिनिटांनी पोहोचेल. नांदेड ते श्रीगंगानगर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (०७६२४) ही गाडी १ एप्रिल गुरुवार पासून नांदेड येथून दर गुरुवारी सकाळी ६ वाजुन ५० मिनिटांनी सुटून श्रीगंगानगर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ७ वाजुन २० मिनिटांनी पोहोचेल.

महत्वाच्या बातम्या