खुशखबर! रिलायन्स बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड!

Mukesg Ambani

मुंबई: देशातील सर्वात मोठे उद्योगपती असणारे मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडने आणखी एक मोठे यश प्राप्त केले आहे. कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या काळात देखील अब्जावधींची परकीय गुंतवणूक मिळवणाऱ्या रिलायन्सने ‘फ्युचरब्रँड इंडेक्स २०२०’ मध्ये उंच झेप घेतली आहे.

या इंडेक्स ब्रँडमध्ये थेट दुसऱ्या क्रमांकाचे स्थान रिलायन्सने पटकावले असून यातील एक खास गोष्ट म्हणजे कंपनीचे बाजारमूल्य १४ लाख कोटींवर जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे आता कंपनी कर्जमुक्त झाली आहे. तर, शेअर्स २ हजार २०० रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत.  ‘फ्युचरब्रँड इंडेक्स’ हे जगातील सर्वात मोठ्या ब्रँडची माहिती देत असतो. आता, सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब असून रिलायन्स हि फक्त भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठ्या ब्रँड्सच्या दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाली आहे.

मोदींचे कौतुक करणे आमदाराला पडले चांगलेच महागात;पक्षाने केली निलंबनाची कारवाई

तर, पहिल्या क्रमांकावर लोकप्रिय व दर्जेदार ब्रँडचे मोबाईल फोन म्हणजेच आयफोन बनवणारी ऍपल आहे. दरम्यान, रिलायन्स कंपनीमध्ये वाढती गुंतवणूक बघता ऍपलला देखील मागे टाकले तर नवल वाटायला नको! त्यामुळे, येत्या काळात रिलायन्स जगातील सर्वात मोठा ब्रँड बनेल यात शंका नसून प्रत्येक भारतीयांसाठी हि गर्वाची बाब ठरेल.

कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर द्या : आयुक्त तुकाराम मुंढे

आता, रिलायन्स सर्वच बाजूनी भक्कम असून भारतातील सर्वाधिक फायदा कमावणारी कंपनी देखील ठरली आहे. कंपनीची विश्वासार्हता व नैतिकता बघता अधिकाधिक लोक रिलायन्सला पसंती देत असल्याचे देखील या ब्रँडने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या यशाचे सर्व श्रेय हे मुकेश अंबानींना जाते. आज रिलायन्स हि कंपनी ऊर्जा, पेट्रोलियम, वस्त्रोद्योग, नैसर्गिक संसाधने, रिटेल, दुरसंचारसारख्या क्षेत्रात काम करत आहे. तर, गुगल आणि फेसबुकसारख्या मोठ्या सोशल प्लॅटफॉर्मसनी देखील या कंपनीमध्ये भागीदारी खरेदी केल्याचे या अहवालात म्हटले आहे.

मामांनी लढाई जिंकली, शिवराज सिंह चौहान यांची कोरोनावर मात