खुशखबर! गुगलने ‘डिजिटल इंडिया’ साठी केली तब्बल १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

google-ceo-sundar-pichai-says-hopefully-i-will-return

मुंबई: जगभरात कोरोनाने थैमान घातले असून अनेक देशांमध्ये लॉकडाऊन केल्यानंतर बेरोजगारी व मंदीचे सावट पसरले होते. मात्र, आता भारतासाठी एक खूप महत्वाची व आनंदाची बातमी आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या गुगल(GOOGLE) ने भारतासाठी एक चांगली गुंतवूणक करण्याचे ठरविले आहे.

गुगलने आपले भविष्यातले गुंतवणुकीचे आडाखे सादर केले आहेत आणि फक्त भारतामध्ये त्यांची १० अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास ७५००० कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. गुगल चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई यांनी आज ही मोठी घोषणा केली. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी ही रक्कम असेल.

‘फडणवीसांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालावी, म्हणजे सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम दिसेल’

सुंदर पिचाई यांनी Google for India या कार्यक्रमाअंतर्गत पुढच्या काही वर्षांत भारतात मोठी गुंतवणूक होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. वेगवेगळ्या संस्थांमधली भागिदारी, इक्विटी, पायाभूत सुविधा आणि डिजिटायझेशनसाठीच्या इतर सोयींसाठी ही १० अब्ज डॉलर्सची रक्कम फक्त भारतात खर्च होईल. पुढच्या पाच ते सात वर्षांत ही गुंतवणूक होईल, असंही सुंदर पिचाई यांनी सांगितलं.

सुंदर पिचाई यांनी केलेली हि घोषणा भारतासाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. यातील महत्वाचा भाग म्हणजे यामुळे भारतातील डिजिटायझेशन साठी मोठा फायदा होणार आहे. तर भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत माहिती आणि सेवा देण्यासाठी गुगल प्रयत्न करणार आहे. त्यामुळे भारतीय भाषांमधल्या माहितीसाठी या गुंतवणुकीचा उपयोग होईल. Google for India digitisation fund या अंतर्गत ही गुंतवणूक केली जाईल.

राज्यातील आणखी एका जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन