खुशखबर, आता घरबसल्या काढा लर्निंग लायसन्स! आरटीओचा दिलासादायक निर्णय

औरंगाबाद : औरंगाबाद शहराचा पॉझिटिव्हीटी रेट पाच पेक्षा कमी आल्याने ७ जूनपासून शहरात अनलॉक करण्यात आले आहे. मात्र येत्या काळात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. आरटीओ कार्यालयात होणारी गर्दी कमी करण्यासाठी आता लर्निंग लायसन्सची परिक्षा देणार्‍या उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे.

ऑनलाईन परिक्षेत पास झालेल्या उमेदवारांना घर बसल्या लर्निंग लायसन्सची प्रिंट घेता येणार आहे. हा निर्णय परिवहन आयुक्त यांनी घेतला आहे. या प्रमाणे काम करण्याचे निर्देश संबंधीत राज्यातील सर्व प्रादेशिक आरटीओ कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आले आहे. परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी ८ जुन रोजी याबाबत आदेश काढले आहे.

या आदेशाप्रमाणे शिकाऊ वाहन परवाना घेणार्‍या उमेदवारांना आपले नाव, पत्ता, व स्वाक्षरी यासह आधार क्रमांकाची नोंद संकेत स्थळावर करावी लागेल. यानंतर अर्जदार यांना ऑनलाइन पद्धतीने रस्ता सुरक्षा विषयक व्हिडीओ पाहणी केल्यानंतर घर बसल्या शिकाऊ उमेदवारांना रस्ता सुरक्षा विषयक विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दयावी लागतील.

यात ६० टक्के अचुक उत्तर दिल्यास, चाचणी उत्तीर्ण होऊन उमेदवारांना घरबसल्या लर्निंग लायसन्सची प्रिंट काढता येईल. यामुळे लर्निंग टेस्ट देण्यासाठी आरटीओ कार्यालयात येण्याची नागरिकांना गरज पडणार नाही. तसेच उमेदवारांना मेडीकल प्रमाणपत्रही ऑनलाईन सादर करता येणार आहे. अशी माहितीही आरटीओ विभागाकडून देण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवाराला ऑनलाइन परिक्षा देण्याची सुविधा सुरू केली असताना आता मोटारसायकल आणि कार या नवीन वाहनांच्या प्रथम नोंदणीकरिता मोटार वाहन निरीक्षकांमार्फत वाहन तपासणीचीही आवश्यकता राहणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

IMP