मराठा क्रांती मोर्चात येणाऱ्यांसाठी खुशखबर

maratha kranti morcha

वेबटीम : ९ ऑगस्ट रोजी मुंबईत संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजाच्या मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातून लाखो लोक मोर्चात उपस्तिथ राहणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रासह इतर शेजारील राज्यातून मुंबईत पोहोचणाऱ्या रेल्वे गाडयांना ज्यादा डब्बे जोडण्याची खासदार संभाजीराजे छत्रपती यांची मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी तातडीने मान्य केली आहे.
आज दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या कार्यालयात खासदार संभाजीराजे यांनी भेट घेतली. या प्रसंगी संभाजीराजे यांनी मराठा क्रांती मोर्चाची सर्व माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिली तसेच महाराष्ट्रातून लाखो लोक मोर्चास येणार असल्याने वाहनांची सोय होणे अवघड असल्याने रेल्वेला अतिरिक्त डब्याची सोय केली तर सर्व मराठा बांधव सुरक्षितपणे मोर्चास येऊ शकतील, असे समजावून सांगितले. जवळ आलेल्या या मोर्चाचे गांभीर्य लक्षात घेवून प्रभुनी ज्यादा डब्याची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ही मागणी मान्य झाल्याने हजारो मराठा मोर्चेकऱ्यांना मुंबईत मोर्चासाठी येणे शक्य होणार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.