स्टेट बँकेत पेन्शन खाते असलेल्या नागरिकांना दिलासादायक बातमी

नवी दिल्ली : निवृत्तीनंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनची चिंता असते. तसेच बँके संदर्भात देखील अनेक अडचणी, तक्रार असतात. याबाबत आता स्टेट बँकेत पेन्शन खाते असलेल्या नागरीकांना दिलासादायक बातमी दिली आहे. एसबीआय पेन्शन सर्व्हिसेस वेबसाईट अपग्रेड करण्यात आली आहे.

एसबीआयने ट्विटमध्ये लिहिले आहे, सर्व पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी. आम्ही आमची पेन्शन सेवा वेबसाइट अपडेट केली आहे जिथे पेन्शनशी संबंधित सर्व सेवा तुमच्या सोयीनुसार व्यवस्थापित केल्या जाऊ शकतात. जर एखाद्या ग्राहकाला पेन्शन सेवेशी संबंधित काही तक्रार असेल, तर तो एसएमएसद्वारे त्याचे निरसन करू शकता येऊ शकते.

पेन्शन वेबसाइटवर या सुविधा असणार उपलब्ध –

 • थकबाकी कॅल्क्युलेशन शीट डाउनलोड करू शकता
 • पेन्शन स्लिप किंवा फॉर्म 16 डाउनलोड करू शकता
 • पेन्शन प्रोफाईल तपशील पहा
 • आपण गुंतवणुकीशी संबंधित तपशील पाहू शकता
 • लाईफ सर्टिफिकेट स्टेटस पहा
 • व्यवहार तपशील पाहण्याची सोय
 • पेन्शन संबंधित सेवा व्यवस्थापित करण्यासाठी ग्राहक एसबीआय पेन्शन सेवा वेबसाइटला भेट देऊ शकतो.

 पेन्शन सेवेशी संबंधित  अशी करा तक्रार –

 • एसएमएसद्वारे त्याचे निराकरण करू शकतो.
 • जर एखाद्या ग्राहकाला लॉग इन करताना कोणतीही समस्या येत असेल तर तो [email protected] वर ईमेल करू शकतो.
 • यासाठी ग्राहकाला त्रुटीचा स्क्रीनशॉटही पाठवावा लागेल.
 • जर ग्राहक पेन्शन सेवेवर खूष नसेल किंवा पेन्शन पेमेंटमध्ये समस्या असेल तर तो त्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून UNHAPPY 8008202020 वर संदेश पाठवू शकतात .

एसबीआयच्या पेन्शनवेबसाईटवर पेन्शन पेमेंट तपशीलांसह ग्राहकांच्या मोबाईल फोनवर एसएमएस अलर्ट देण्यात येते. तसेच ई-मेल किंवा पेन्शन देणाऱ्या शाखेद्वारे पेन्शन स्लिप मिळवण्याची सुविधा, बँक शाखेत जीवनप्रदान सुविधा आणि कोणत्याही एसबीआय शाखेत जीवन प्रमाणपत्र सादर करता येण्याची विविध सुविधा देण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या